नव्या इमोजींमुळे चॅटिंगची मजा वाढणार

emoji
व्हॉटसअप, फेसबुक या सारख्या सोशल मिडिया साईटवर प्रत्येक युजर त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा मोठा वापर करत आहेत. सध्याचा या यादीत आणखी २३० नव्या इमोजींची भर पडली असून युनिकोडने २०१९ साठी अधिकृत २३० इमोजींची यादी सादर केली आहे. यात ५९ नव्या इमोजींचे १७१ व्हेरीयंट मिळवून हि संख्या २३० झाली आहे.

नव्या इमोजीमध्ये मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, जांभई देणारा माणूस, गाईड डॉग, ब्लड ड्रॉप, लोणी, कांदा, लसूण, ज्यूस बॉक्स असे अनेक सिम्बॉल आहेत. त्याचबरोबर व्हीलचेअरवर बसलेला माणूसही आहे. अनेक नवीन कॅरेक्टर बरोबर नवीन रंग जारी केले गेले आहेत. हृद्य, चौकोन, वर्तुळ या आकाराना रेम्बो कलर दिले गेले असून यात पांढऱ्या रंगाचे हृद्य आहे. येत्या सप्टेंबर ऑक्टोबर पासून युजर या इमोजी वापरू शकणार आहेत.

प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार इंटरनेट वापरकर्ते दररोज सरासरी ९० कोटी इमोजी एकमेकांना पाठवितात. या इमोजींचा अर्थ समजावा म्हणून इमोजीपिडिया बनविला गेला आहे. युनिकोडच्या स्टँडर्ड लिस्टनुसार सध्या २६६६ इमोजी वापरात आहेत.

Leave a Comment