नर्सने लिहिला मेसेज, रुग्णाचे प्राण आले कंठाशी

message
परक्या देशात आजारी पडले आणि दुर्देवाने शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर काय होऊ शकते याचा अनुभव चीन मध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका परदेशी विद्यार्थ्याला आला. हा विद्यार्थी अचानक आजारी पडला आणि रुग्णालयात त्याला दाखल व्हावे लागले. तेव्हा डॉक्टरने शस्त्रक्रिया करावी लागेल असे निदान केले.

हा विद्यार्थी रात्री रुग्णालयात दाखल होता तेव्हा दुसरे दिवशी होणाऱ्या शस्त्रक्रियेच्या सूचना देण्यासाठी आलेल्या नर्सला इंग्रजी येत नव्हते त्यामुळे तिने चित्राच्या माध्यमातून सूचना दिल्या. हा कागद सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि लोकांनी या चित्रलिपीतून अनेक अर्थ काढले. या कागदावर खाण्याच्या सूचनेच्या जागी चॉपस्टिक आणि वाडगा, पाणी पिणे यासाठी नळ आणि त्यातून पाण्याची धार आणि रात्री १० नंतर हे घेऊ नये यासाठी नो हे अक्षर होते.

सगळ्यात मजेशीर मजकूर पुढे होता. सकाळी ८ वा.ऑपरेशन यासाठी चक्क चाकू आणि त्याखाली रक्ताचे थेंब दाखविले गेले होते. सुदैव इतकेच कि संबंधित रुग्णाला हि चित्रलिपी व्यवस्थित समजली होती.

Leave a Comment