‘या’ ट्रिकच्या माध्यमातून निवृत्त दाम्पत्याने आतापर्यंत जिंकले १८६ कोटी

lottery
आतापर्यंत अनेकवेळा अमेरिकेतील मिशिगनमधील एका दांपत्याने लॉटरी जिंकली आहे. त्यांनी तब्बल १८६कोटी रूपये या लॉटरीमधून कमावले आहेत. आता हॉलिवूडवाले या दांपत्याच्या लॉटरी विजयाच्या ट्रिकवर चित्रपट बनवणार आहेत. लॉटरी जिंकण्याच्या ट्रिकचा निवृत्त असणाऱ्या दापंत्याने वृत्तवाहिनीवरील शो दरम्यान खुलासा केला आहे.

जेरी सेल्बी आणि मार्ज सेल्बी असे या दापत्यांचे नाव आहे. या दापंत्याने सामान्य अंकगणिताच्या साह्याने अनेकवेळा लॉटरी जिंकली आहे. आपल्या कुटुंबिय आणि मित्रांनाही या ट्रिकच्या वापर करून त्यांनी लॉटरी लावण्याचा सल्ला दिला आहे. हॉलिवूडमधील निर्मात्यांनी या दापंत्याच्या या अनोख्या शैलीवर चित्रपट तयार करण्यासाठी राइट्स खरेदी केले आहेत. तब्बल सहा वर्षापर्यंत जेरी आणि मार्ज या दांपत्याने लॉटरीची तिकीटे विकत घेतली. ते प्रत्येकवेळी लॉटरी जिंकत कोट्यधीश झाले आहेत.

मिशिगन विद्यापिठातून पतीने गणितामधून पदवी घेतली आहे. ज्यावेळी पहिल्यांदा त्याच्या हातात लॉटरीचे तिकीट आले त्यावेळी त्याने अंकगणिताचा फॉर्मुल्याचा वापर केला. हे दांपत्य लॉटरी लागण्यापूर्वी १७ वर्षांपासून किराणा दुकान चालवत होते. पण २००३ मध्ये त्यांनी दुकान बंद केले. जर कोणी ५० लाख डॉलरचा जॅकपॉट जिंकला नाही तर ते पैसे अन्य लॉटरीवाल्यांना दिले जातात. ५० लाख डॉलर ज्याच्या लॉटरीचे आधिकाधिक क्रमांक जुळतात अशा तीन-चार जणांना वाटले जातात. हीच बाब हेरुन या दांपत्याने शेकडो तिकीटे खरेदी करत असे. त्यांना प्रत्येकवेळी तिकिट विकत घेतलेल्या रकमेपेक्षा दुप्पट पैसे मिळतात.

Leave a Comment