
रिलायन्स जिओच्या टेलिकॉम क्षेत्रातील आगमनानंतर इतर मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार प्राईज वॉर सुरु असून या कंपन्या एकमेकांमध्ये वरचढ होण्यासाठी सातत्याने नवनवीन प्लॅन जाहीर करत असतात. त्यात आता व्होडाफोनने रिलायन्स जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक आकर्षक प्लॅन आणला आहे.
व्होडाफोनने आणला ११९ रुपयांचा सर्वात स्वस्तात मस्त प्लॅन
आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी व्होडाफोनने ११९ रुपयांचा आकर्षक प्लॅन आणला आहे. ग्राहकांना यामध्ये फ्री कॉलिंग आणि एक जीबी डेटा प्रतिदिवस मिळणार आहे. २८ दिवसांची या प्लानची वैधता असणार आहे. एसएमएसची सुविधा यामध्ये नसणार आहे. एसएमसच्या सुविधासाठी १६९ रूपयांचा आहे. त्यामध्ये प्रतिदिन फ्री कॉलिंग आणि एक जीबी डेटांसह दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत. सध्या हे दोन्ही प्लॅन मोजक्याच 4G सर्कलसाठी उपलब्ध आहे. याचा विस्तार लवकरच पूर्ण भारतभर होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.
