'भाभी'जींचा लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश ? - Majha Paper

‘भाभी’जींचा लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश ?

shilpa-shinde
नवी दिल्ली – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’ मुळे प्रसिद्धीझोतात आलेली आणि बिग बॉसच्या ११व्या पर्वाचे विजेती ठरलेली शिल्पा शिंदे लवकरच राजकारणात प्रवेश घेणार आहे. ती लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिल्पा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

१९९९ मध्ये शिल्पाने छोट्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत तिने ‘अंगुरी भाभी’चे पात्र साकारले होते. ती या पात्रामुळे घराघरात लोकप्रिय बनली होती. तिने ही मालिका २०१६ मध्ये सोडल्यानंतर बिग बॉसच्या ११व्या पर्वात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वाची ती विजेतीही ठरली. आता छोटा पडदा गाजवल्यानंतर राजकारणात तिची छाप कशाप्रकारे पाडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment