मुंबईत पहिल्यांदाच उघडपणे समलैंगिक लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन

gay
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने पाचच महिन्यांपूर्वी दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध कलम 377 अंतर्गत गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत उघडपणे समलैंगिक लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील विनोद आणि फ्रान्सचे विन्सेंट यांनी साताजन्माची गाठ बांधली.

अद्याप समलैंगिक विवाहाला भारतात मान्यता नसली, तरी समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर आणणे हे ‘गे मॅरेज’च्या दिशेने पाऊल असल्याचे एलबीजीटी समुदाय मानते. रेनबो व्हॉईस मुंबईचे संस्थापक असलेले 43 वर्षीय विनोद फिलीप आणि फ्रान्सचे रहिवासी असलेले त्यांचे 47 वर्षीय मित्र विन्सेंट यांचा विवाह झाला होता.
gay1
फ्रान्समध्ये गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी लग्न केल्यानंतर मुंबईतील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे मित्र आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. 2014 साली चेन्नईहून विनोद मुंबईत आले. त्यांनी तेव्हापासून एलजीबीटी समुदायासाठी काम करण्यास सुरुवात केली. या शहराने ओळख दिल्यामुळे विनोद यांना मुंबईविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे मुंबईत विवाहसोहळा आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

2016 मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून पॅरिसमध्ये दोघांची ओळख झाली होती. चॅटिंग करता-करता दोघांनी डेटिंग सुरु केले. सहा महिन्यांनंतर ते दोघे एकत्र राहायला लागले. त्यानंतर दोघांना प्रेमाची जाणीव झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा समलैंगिक विवाह असल्याची माहिती अखेरच्या क्षणापर्यंत हॉटेल व्यवस्थापनापासून लपवण्यात आली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबत माहिती मिळताच व्यवस्थापनाने पूर्ण सहकार्य केले.

Leave a Comment