जाणून घेऊया डोनाल्ड पुत्र बॅरन ट्रम्प विषयी काही

Baron-Trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वच अपत्ये सातत्याने प्रसिद्धीच्या झोतामध्ये असली, तरी त्यांचा सर्वात धाकटा पुत्र बॅरन याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये खूपच कुतूहल पहावयास मिळते. राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्डची निवड झाली असता झालेल्या सभेमध्ये, डोनाल्डच्या समवेत असलेल्या बॅरनने पहिल्यांदाच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बॅरन हा डोनाल्ड आणि मेलानिया ट्रम्प यांचा एकुलता एक मुलगा असून, डोनाल्ड यांची बाकीची अपत्ये डोनाल्डची पहिली पत्नी इव्हाना आणि दुसरी पत्नी मार्ला मेपल्स यांची आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक झाल्यांनतर डोनाल्ड यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्थलांतर केले असले, तरी बॅरन त्याच्या आईसमवेत काही महिने न्यूयॉर्क मधील ट्रम्प टॉवर्स येथील आलिशान पेंटहाउसमधेच वास्तव्य करून होता.
Baron-Trump1
आता बॅरन आणि मेलानिया यांनी देखील व्हाईट हाऊसमध्ये मुक्काम हलविला असून, तत्पूर्वी बॅरन शिकत असलेल्या अतिशय प्रतिष्ठित ‘कोलंबिया ग्रामर अँड प्रेपरेटरी स्कूल’मध्ये शैक्षणिक वर्ष पार पडे पर्यंत बॅरनला त्याच्या आईसमवेत ट्रम्प टॉवर्स येथे राहवे लागले होते. आता बॅरन आपल्या आईवडिलांच्या समवेत व्हाईट हाऊस येथे रहात असून, गेल्या साठ वर्षांच्या इतिहासामध्ये व्हाईट हाऊसमध्ये राहणारा बॅरन हा पहिला ‘राष्ट्रपती-पुत्र’ ठरला आहे. बॅरनची जीवनशैली अतिशय ऐषारामी असून त्याचा स्वभाव डोनाल्डच्या स्वभावाशी मिळता जुळता असल्याचे म्हटले जाते. बॅरन हा डोनाल्ड प्रमाणेच अतिशय हट्टी, मनाने कणखर आणि अतिशय हुशार असून त्याला त्याच्या वडिलांच्या प्रमाणे यशस्वी उद्योगपती व्हायचे असल्याचे मेलानिया ट्रम्प म्हणते

Leave a Comment