श्रीलंकेच्या या फलंदाजाने एकाच सामन्याच्या दोन्ही डावात ठोकली दोन द्विशतके

sri-lanka
कोलंबो : श्रीलंकेच्या एका फलंदाजाने एकाच सामन्याच्या दोन्ही डावात दोन द्विशतके झळकवण्याचा विक्रम केला आहे. त्या फलंदाजाचे नाव अँजेलो परेराने असे आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा 2013 ते 2016 या कालावधीत श्रीलंकेच्या वन डे व ट्वेंटी-20 संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डावखुऱ्या फलंदाज परेराने विक्रम केला. परेरा कोलंबो येथील सिन्हालेसे स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात नॉडेंस्क्रिप्ट्स सीसी संघाचे नेतृत्व करत होता आणि त्याने ही अविश्वसनीय खेळी श्रीलंकेच्या प्रथम श्रेणी प्रीमिअर लीगच्या टायर A गटातील एसएससी संघाविरुद्ध साकारली.

पहिल्या डावात 28 वर्षीय परेराने 203 चेंडूंत 201 धावा चोपल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात 268 चेंडूंत 231 धावा केल्या. त्याच्या या खेळी व्यतिरिक्त दोन्ही संघांतील एकूण तीन फलंदाजांनी शतकी खेळी साकारली. चार दिवसांच्या या सामन्यात एकूण 26 विकेट्स गेल्या. परेराच्या संघाला या सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. दरम्यान एकाच सामन्यात दोन द्विशतके परेराने झळकावून 80 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. 1938 मध्ये इंग्लंडच्या ऑर्थर फेग यांनी केंट्स क्लबकडून खेळताना एसेक्सविरुद्ध एकाच सामन्यात दोन द्विशतके केली होती. फेग यांनी 244 आणि नाबाद 202 धावा केल्या होत्या.

Leave a Comment