वरूणने शेअर केला ‘एबीसीडी ३’मधील एक खास फोटो

varun-dhawan
लवकरच ‘एबीसीडी’चा तिसरा भाग म्हणजेच ‘एबीसीडी ३’ घेऊन रेमो डिसूझा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असून चित्रपटाची एक झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.


हा फोटो वरूण धवनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत याला २०१९ मध्ये रूल ब्रेकर्स येत असल्याचे कॅप्शन दिले आहे. पण वरूणचा चेहरा पाहायला मिळत नसल्यामुळे चाहत्यांना त्याच्या लूकसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. श्रद्धा कपूर आणि वरूण धवनशिवाय चित्रपटात प्रभूदेवा आणि नोरा फतेही यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अमृतसरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान वरूणच्या गुडघ्याला दुखापतदेखील झाली होती. हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment