सीबीआय संचालकपदाचा पदभार ऋषी कुमार शुक्ला यांनी स्वीकारला

rishi-kma-shukla
नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय निवड समितीने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालक पदावर ऋषी कुमार शुक्ला यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे. शनिवारी शुक्ला यांची या पदासाठी निवड करण्यात आली होती.

या संस्थेच्या कार्यक्षमतेवर सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्या वादानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण शुक्ला हे भ्रष्टाचार मुक्त असून कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नाहीत, असे म्हटले जाते.

Leave a Comment