दिशा वाकानी ‘तारक मेहता..’मध्ये न परतण्यामागे हे आहे खरे कारण

disha
सब टीव्हीवरील तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या पसंतीची अव्वल मालिका ठरत आली आहे. या मालिकेतील ‘दयाबेन’चे पात्र, मालिकेतील प्रमुख पात्रांपैकी एक असून, अतिशय लोकप्रिय आहे. या पात्राची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वाकानी हिला २०१७ साली लाभल्यामुळे तिने काही काळासाठी या मालिकेचा तात्पुरता निरोप घेतला होता. त्यानंतर योग्य वेळी दिशा या मालिकेमध्ये परतणार असल्याचे ही वृत्त होते. मात्र दिशाची अद्याप या मालिकेमध्ये पुन्हा एन्ट्री झाली नसून, ती या मालिकेमध्ये केव्हा परतणार, किंवा परतणार की नाही हे जाणून घेण्यास या मालिकेचे चाहते उत्सुक आहेत.
disha1
दिशाने तिच्या लहान मुलीचा सांभाळ करण्यासाठी मालिकेतून तात्पुरती रजा घेतली असल्याचे जरी खरे असले, तरी दिशा अजूनही या मालिकेमध्ये परतू न शकण्यामागचे कारण तिचा पती, मयूर पाडिया असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेमध्ये परतण्यासाठी दिशाने आपल्या पतीच्या सल्ल्यानुसार मानधन वाढवून मागितले होते. दिशाच्या वतीने मालिकेच्या निर्मात्यांच्या सोबत दिशाचा पती मयूर बोलणी करीत असून, वाढीव मानधनासोबतच मयूरने अनेक विचित्र अटी निर्मात्यांच्या समोर ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे निर्मात्यांकडून दिशाला पूर्वीच्या काही एपिसोड्सचे मानधन येणे असल्याचे ही मयूरचे म्हणणे आहे.
disha2
मालिकेमध्ये परतण्यासाठी दिशाच्या वतीने मयूरने मानधन वाढवून मागितलेच आहे, शिवाय दिशा महिन्यातून पंधरा दिवसच काम करेल आणि दिवसाचे केवळ चारच तास काम करेल अशा काही अटी मयूरने निर्मात्यांच्या समोर मांडल्या आहेत. या अटी निर्मात्यांनी नामंजूर केल्याने दिशा या मालिकेमध्ये परतणार किंवा नाही, की दिशाच्या जागी इतर कोणी अभिनेत्री ‘दयाबेन’च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे, हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. त्याचबरोबर दिशाला पूर्ण मानधन दिले गेले असून, कोणतीही बाकी नसल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment