प्रवीणकुमारला व्हायचे आहे गोलंदाजी प्रशिक्षक

praveen-kumar
मुंबई – इच्छा स्विंगचा किंग आणि भारतीय क्रिकेट संघातून निवृत्त झालेल्या प्रवीण कुमारने गोलंदाजी प्रशिक्षक होण्याची संधी दिली तर मला नक्कीच आवडेल. पण त्यासाठी कुठलाच प्रस्ताव आला नाही. भविष्यात मला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

प्रवीण कुमार भारतीय संघाचे कौतुक करताना म्हणाला की, आपल्याकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात वेगवेगळ्या प्रकारचे गोलंदाज आहेत. गोलंदाजांचे ऑस्ट्रेलियातील विजयात मोठे योगदान आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या शैलीचे गोलंदाज असल्याचा फायदा होत आहे. डेथ ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. आयपीएल खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. आयपीएलने गोलंदाजांना खूप काही शिकविले असल्यामुळेच आपली गोलंदाजी मजबूत झाल्याचे प्रवीणने सांगितले. प्रवीण भुवनेश्वर कुमारच्या बाबतीत बोलताना म्हणाला की, तो २००८ मध्ये आला होता तेव्हा तो १२०-१२२ च्या स्पीडने गोलंदाजी करत होता. सगळ्या ट्रेनिंग तो करत गेला. स्वत:ला फिट ठेवल्यामुळे त्याच्यात फरक पडल्याचे सांगितले.

पाँटिंग, हेडन, गिलख्रिस्टसारख्या आक्रमक खेळाडूंमुळे ८-१० वर्षापूर्वीचा ऑस्ट्रेलिया संघ मजबूत होता. आताचा संघ चांगला नाही. अनुभवी खेळाडूंची ऑस्ट्रेलियाच्या संघात कमतरता भासली. त्याचा फायदा घेत भारताला विजय मिळविला. स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वार्नर यांची कमतरता संघाला नक्कीच जाणवली असे प्रवीणने सांगितले.

Leave a Comment