‘वाह जिंदगी’ चित्रपटाचे ए. आर. रेहमान यांनी केले म्युझिक लाँच

ar-rahman
‘वाह जिंदगी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे प्रसिद्ध गायक व संगीतकार ए. आर. रेहमान यांनी म्युझिक लाँच केले आहे.

‘वाह जिंदगी’ या चित्रपटात नवे चेहरे दिसणार आहे. संजय मिश्रा, विजय राज, प्लबिता बोरठाकूर, नविन कस्तुरीया आणि मनोज जोशी हे कलकार या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश यादव हे करत आहेत. ‘मेक इन इंडिया’ या कल्पनेवर आधारित हा चित्रपट आहे.

‘वाह जिंदगी’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन पराग छाबरा करत आहेत. पराग छाबरा यांनी यापूर्वीही ए.आर. रेहमान यांच्यासोबत ‘सचिन- द बिलियन ड्रीम्स’, ‘मॉम’ आणि ‘मोहेनजोंदारो’, या चित्रपटात काम केले आहे. ट्विटर अकाऊंटवरुन ए.आर. रेहमान यांनी ‘वाह जिंदगी’च्या संगीत सोहळ्याच्या अनावरणाचे काही फोटो शेअर केले आहे.

Leave a Comment