भाजपवाले मते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात; ओमप्रकाश राजभर

omprakash-rajbhar
लखनऊ – भारतीय जनता पक्षाला नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीत आणणारे मित्रपक्ष सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीका केली आहे. आपल्या फायद्यासाठी भाजप देशभरात दंगली घडवू शकते, असा आरोप ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे.

पुन्हा एकदा भाजपसमोर अडचणी उभ्या करणारे वक्तव्य ओमप्रकाश राजभर यांनी करत म्हटले आहे की, देशभरात भाजप जातीय दंगली घडवू शकते असे वक्तव्य त्यांनी एका रॅलीत बोलताना केले. त्यांनी यावेळी अमेरिकेने दिलेल्या त्या अहवालाचा उल्लेख केला, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीआधी भारतात जातीय दंगली होऊ शकतात असे सांगण्यात आले होते. या दंगली भाजपच घडवू शकते, असे राजभर यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, राम मंदिराच्या नावे लोकांना 21 फेब्रुवारीला भडकावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. सध्या दंगली घडवण्याच्या मूडमध्ये भाजप आहे. मते मिळवण्यासाठी भाजपवाले कोणत्याही थराला जाऊ शकतात. यावेळी हिंदू आणि मुस्लिमांना एकजूट राखण्याचे आवाहन राजभर यांनी केले आहे.

Leave a Comment