संभ्रमित होऊ नका; असे निवडा तुमचे केबल किंवा डीटीएच चॅनल

trai
नवी दिल्ली : कालपासून केबल आणि डीटीएचच्या नियमात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केलेल्या बदलांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. ग्राहकाला या नियमाच्या अंतर्गत त्यांच्या आवडीच्या चॅनलची निवड करता येणार आहे. पण कशा प्रकारे हे चॅनल निवडावे याची माहिती ग्राहकांकडे नसल्यामुळे ते गोंधळून जात आहेत. ट्रायने यासाठीच चॅनलची निवड करण्यासाठी नवीन वेब ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. ग्राहकाला यातून त्यांच्या आवडत्या चॅनलची कशाप्रकारे निवड करायची याची योग्य माहिती देण्यात आली आहे.

या ऍप्लिकेशनचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला https://channel.trai.gov.in/ येथे जावे लागेल. वेबसाइटवर गेल्यावर Get Started वर क्लीक करा, क्लीक केल्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. सर्वात प्रथम ग्राहकाला त्याची संपूर्ण माहिती (नाव, राज्य इत्यादी ) द्यावी लागेल. सर्व प्रश्नांचे योग्य उत्तर दिल्यावर ग्राहकाला त्याच्या नावासमोर चॅनलची यादी दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर ग्राहकाला त्याच्या आवडीच्या चॅनलसह मासिक योजनेचीही योग्य माहिती मिळणार आहे. View Selection बटणावर क्लीक केल्यावर तुम्ही निवडलेल्या चॅनलचे मूल्य दाखवण्यात येणार आहे. या वेबसाईटवर फ्री चॅनेल, पेड चॅनल यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जर ग्राहकाला त्यांच्या आवडीच्या चॅनलचे दर जास्त वाटत असल्यास त्यांच्यासाठी दुसरा पर्याय देण्यात आला आहे. चॅनेल निवड ऍप्लिकेशनच्या उजव्या बाजूस चॅनलची किंमत, एचडी / एसडी, ब्रॅाडकॉस्टर आणि भाषांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ग्राहक त्याच्या गरजे प्रमाणे चॅनेल सेट करु शकतो.

Leave a Comment