जगातील ‘या’ देशातील गावात तुम्हाला मिळेल मोफत घर आणि पैसे

italy
जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्ही आमच्या देशात या आम्ही तुम्हाला मोफत घर तर देऊच पण त्यासोबतच तुमचा उदारनिर्वाह चालवा म्हणून पैसे देखील देऊ. आहे कि नाही तुमच्या कामाची बातमी. पण हे खरे आहे. इटली या देशात एक असे एक गाव आहे जिथे अशा प्रकारची ऑफर दिली जात आहे आणि ही ऑफर फक्त तरुणांसाठी. येथे राहायला येणाऱ्या तरुणाला मोफत घर आणि त्यासोबतच 8.17 लाख रुपये मिळणार आहेत. या गावात अत्यंत जुन्या शैलीतील घरे आहेत त्याचबरोबर येथील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना साद घालत असतो.
italy1
हे गाव उत्तर इटलीतील लोकाना जिल्ह्यात असून या गावात सर्वाधिक वृद्धांची संख्या आहे म्हणून ही ऑफर देण्यात आली आहे. हे गाव इटलीतील मुख्य शहर असलेल्या तुरुनपासून 45 किमी अंतरावर आहे. ही ऑफर सुरुवातील इटलीत राहणा-या नागरिकांसाठी होती. आता ही ऑफर जगभरातील नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. पण यासाठी तुम्हाला काही अटी व नियमांचे पालन करावे लागणार आहे.
italy2
या ठिकाणी राहायला येणा-या जोडप्याला किमान एक अपत्य असावे. त्याचबरोबर उत्पन्न सहा हजार युरो म्हणजेच 4.9 लाख रुपये असायला हवे. तसेच त्यांना गावाकडून मिळणारी रक्कम तीन भागात विभागून दिली जाणार आहे. 1185 साली हे गाव वसले असून ते निसर्गाच्या सौंदर्याने समृद्ध झाले आहे. येथे हाइड्रो इलेक्ट्रिसिटी प्लांट आहे. तिथून इटलीतील राज्यांना वीज पुरवली जाते.
italy3
याबाबत तेथील महापौर गिवोनी ब्रुनो यांचे म्हणणं आहे की तुम्ही येथे येऊन व्यवसायही करू शकता. बंद पडलेली रेस्टाॅरंट आणि बार सुरू करू शकता. 1900च्या सुमारास येथे फक्त 7 हजार लोक रहात होते. पण नोकरीनिमित्त ते शहरात गेले. येथे 40 जणांच्या मृत्यूमागे 10 जन्म एवढाच रेट असल्यामुळे येथील लोकसंख्या वाढत नाही. गावात फक्त वृद्ध माणसे राहतात. इटलीतील बहुतांश गावचे असेच चित्र आहे. म्हणून तिथे अत्यंत कमी किमतीत घरे विकली जात आहेत. इटलीच्या बोर्गोमेजविले गावात तर फक्त 320 लोक राहतात. तिथे मूल जन्माला घातले तर 1000युरो मिळतात. इटलीत संपत्ती खरेदी करायची प्रक्रिया म्हणूनच खूप साधी आणि सरळ आहे.

Leave a Comment