सलमान खान विरोधात विनयभंगाची तक्रार

salman-khan
मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्ध झालेला कोरिओग्राफर सलमान युसूफ खान याच्या विरोधात एका कोरिओग्राफर महिलेने विनयभंगाची दाखल केली आहे.

दुबईत डान्स शो करायचे आहेत असे सांगून सलमान खान मुंबईत मला भेटला, त्याने तेव्हा पहिल्यांदा गैरवर्तन केले. फिल्म इंडस्ट्रीत ह्या गोष्टी त्यावेळी होत असतात, असे सलमान म्हणाल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याने त्यानंतर दुबईतील डान्स शोचे काम दिल्यानंतर सलमानने त्याच्या भावासह बेहरीन येथे गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

माझ्यावर विश्वास ठेवून दुबईतील बॉलीवूड पार्कमध्ये डान्स शोसाठी 40 डान्सरनी करार केला. सलमानने त्यांचे पासपोर्टही काढून घेतले असून आजही ते डान्सर दुबईत अडकल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सलमानने जेव्हा दुबईत असताना आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्याला प्रतिकार केल्याम्हणून त्याने कामावरून काढण्याची धमकीही दिली होती, असा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

सलमान सध्या दुबईत अडकलेल्या डान्सर्ससोबतही गैरवर्तन करत असल्याची भीती वाटते असल्याचेही महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत महिलेने ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात सलमानने छेडछाड करून विनयभंग केल्याचा अारोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.

Leave a Comment