अरे बापरे! चक्क झुरळाशी करत होत एकवर्ष डेट

japan
टोकियो – आपण बहुतेकदा जपानमधील लोक हे किडे आणि विविध प्रकारचे जीव खातात हे ऐकले किंवा पाहिले असेल. पण त्याच देशात एक अशीही व्यक्ति देखील आहे. ज्याचे या किड्यांवर जीवापाड प्रेम आहे. त्याचबरोबर त्याने चक्क एक वर्ष त्या किड्यासोबत डेट देखील केली आहे. त्यात विशेष म्हणजे जेव्हा त्या किड्याचा मृत्यु झाला तेव्हा तो किडा आपल्यासोबत कायम रहावा यासाठी त्याने तो किडा खाऊन टाकला. त्यामागे त्याची अशी धारणा आहे कि असे केल्यामुळे तो किडा आपल्या मनाच्या कोपर-यात कायमाचा असणार आहे.
japan1
जपानच्या युता शिनोहारा (25) ची ही गोष्ट आहे. त्याने त्याने एका झुरळाला डेट केल्याचा दावा केला आहे. त्याने त्या झुरळाचे लिसा नाव ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेतून त्याने ते विकत आणले होते. युताच्या मते, त्याच्यात आणि लिसामध्ये अध्यात्मिक प्रेम होते. त्यांच्यात सेक्श्युअल संबंध नव्हते. त्याबाबत त्याच्या मनात कधी विचार येत होते. तो अशावेळी लिसा त्याच्या एवढी असल्याची कल्पना करायचा किंवा तो लिसाच्या आकाराचा असल्याचा विचार करायचा. युताचे म्हणणे आहे की, लिसा सोबत असलेले संबंध मला प्रचंड आवडत होते. मला वाटायचे आम्ही दोघे आपसांत बोलतो. पण आमची साथ फार काळ टिकली नाही. लिसाचा वर्षभरातच मृत्यू झाला.
japan2
युताने सांगितले 100% आम्ही दोघे सीरियस होतो. कोणतीही मुलगी मला लिसाएवढी आकर्षक वाटत नव्हती. लिसा माझे पहिले प्रेम होती आणि मला प्रचंड आवडत होती. युताला लिसाच्या मृत्यूने प्रंचंड दुःख झाले, पण तिला कायम सोबत ठेवण्यासाठी त्याने एक नामी कल्पना शोधली. त्याने सरळ तिला शिजवले आणि खाऊन टाकले. ती कायम मनाच्या कोपऱ्यात आणि शरीराचा एक बाग बनावी म्हणून असे केल्याचे युता म्हणतो. तिला माझ्यापासून आता कोणीही वेगळे करू शकत नाही असे त्याचे म्हणणे आहे. तो आताही लिसा हेच आपले पहिले प्रेम असल्याचे म्हणतो.
japan3
युता शिनोहारा म्हणतो की आपले निसर्गावर प्रचंड प्रेम आहे. त्याला लहानपणापासून कीडे खाण्याची सवय होती. तो अनेकदा असे इंसेक्ट (कीडे) खाण्याच्या इव्हेंटचे आयोजनही करतो. त्यात कीड्यांचे ड्रिंक्स, कीड्यांची पेस्ट्रीज आणि नूडल्सही असतात. त्याठिकाणी अशी दारुही असते. कॉकरोच आणि निसर्गावर प्रचंड प्रेम असल्याचे युताने सांगितले. तो म्हणतो अशक्य असले तरी त्याची अशी इच्छा आहे की, एक असे जग असावे ज्यात झुरळांचा आकार मानवा एवढा किंवा माझा आकार झुरळाएवढा व्हावा. त्याचे एक आवडीचे झाडही आहे त्याचे नाव त्याने हेवन (स्वर्ग) ठेवले आहे. त्याला मिठी मारून झोपायला त्याला प्रचंड आवडते.

Leave a Comment