भारताकडे २०२१ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ च्या विश्वचषकाचे यजमानपद

ICC
दुबई – २०२१ मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ मध्ये विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे देण्यात आले असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ डेविड रिचर्डसन यांनी स्पष्ट केले आहे. या दोन्ही स्पर्धो कुठे होणार यावर बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे आता या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे.

२०१६ साली भारताने टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले होते. आयसीसीला यावेळी करामध्ये सवलत मिळाली नाही. तरीही आयसीसीने बीसीसीआयला २३ मिलियन म्हणजेच १६१ करोड रुपये देण्यास सांगितले होते. कराच्या सवलती क्रिकेटमध्ये मिळणे गरजेचे आहे. जो पैसा यातून येत असतो त्याचा दुबळ्या क्रिकेट बोर्डाला मदत म्हणून केली जाते. भारतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी अजून बराच अवकाश आहे, त्यावेळी या करामध्ये सुट मिळू शकेल असेही डेविड म्हणाले.

Leave a Comment