इस्त्राईलमधील कंपनी केला कर्करोग मुळापासून नष्ट करणारे औषध सापडल्याचा दावा

cancer
कर्करोग्यांचे प्रमाण दिवसेंदिवस संपूर्ण जगभरात वाढत चालले असून कोणताही उपचार किंवा औषध कर्करोग पूर्णपणे बरा करण्याची खात्री देत नाही. पण कर्करोग मुळापासून नष्ट करण्याचा पर्याय सापडला असून 2020 पर्यंत आपण हे औषध बाजारात आणणार असल्याचा दावा इस्त्राईलमधील एका बायोटेक कंपनीने केला आहे.

कर्करोगवर सध्याच्या घडीला वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारपद्धती उपलब्ध आहेत. पण 100 टक्के कर्करोग बरा करण्याची हमी कोणताही उपचार देत नाही. पण कर्करोग पूर्णपणे बरा करणारे औषध सापडल्याचा दावा 2000 साली स्थापन झालेल्या अॅक्सिलरेटेड इवोल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेडने केला आहे.

कंपनीचे चेअरमन अॅरिडोर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही उपचारपद्धती पहिल्या दिवसापासून कर्करोगावर प्रभाव करण्यास सुरुवात करेल अशी माहिती दिली आहे. यासोबतच दुसरा कोणताही त्रास औषधामुळे होणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत. सध्या उपलब्ध असणाऱ्या उपचारांशी तुलना करता याची किंमत फार कमी आणि परवडणारी असेल असेही त्यांनी सांगितले आहे.

MuTaTo म्हणजेच मल्टी टार्गेट टॉक्सिन असे नाव कंपनीने या उपचारपद्धतीला दिले आहे. कंपनीचे सीईओ डॉ इलान मोराद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात उपलब्ध असलेली औषधे आणि उपचारपद्धती कर्करोगवर प्रभावी का ठरत नाही आहेत याच्या कारणांचा आम्ही शोध घेतला असता हा पर्याय आम्हाला सापडला. या औषधांची चाचणी कंपनी लवकरच करणार आहे. हे औषध पुढील वर्षापर्यंत बाजारात आणण्याचा प्रयत्न असणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment