जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर संजय राऊत बनवणार चित्रपट !

sanjay-raut
भारतीय राजकारणात कामगार नेते अशी ओळख असलेले जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय शिवसेनेचे खारदार संजय राऊत यांनी घेतला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा लिहिण्याचे काम सुरू असून मार्चपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

अल्झायमरच्या आजारामुळे गेली 10 वर्षे अंथरुणाला खिळून असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांचे सोमवारी निधन झाले. युनियन लीडर, समाजवादी नेते, आणीबाणीविरोधक, केंद्रीय मंत्री, खासदार अशा अनेक भूमिका जॉर्ज जगले होते. त्यांचे प्रेरणादायी आयुष्य लोकांसमोर आणण्याच्या हेतूने हा चरित्रपट बनवला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटात 1950 ते 1975 दरम्यानच्या घडामोडींवर प्रामुख्याने भर असेल.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी याबाबतच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. ‘शूजित सरकार याच्या सारख्या हुशार दिग्दर्शकाने या चित्रपटाची जबाबदारी सांभाळावी अशी माझी इच्छा आहे. याबाबत माझी त्याच्याशी चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप काहीही फायनल झालेले नाही,’ असे संजय राऊत म्हणाले.

Leave a Comment