साक्षी आणि अनुष्का, दोघी मैत्रिणी जोडीच्या

sakshi
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी या दोघींमध्ये काय साम्य आहे असे विचारले तर चटकन सांगता येणार नाही. पण प्रत्यक्षात त्या दोघींमध्ये काही महत्वाची साम्ये आहेत. पहिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या दोघींनी टीम इंडियाच्या कप्तानांशी लग्न केले आहे. साक्षीने महेंद्रसिंग धोनीशी तर अनुष्काने विराट कोहलीशी लग्नगाठ बांधली आहे.

हे साम्य इथेच संपत नाही. अनुष्काने तिचे काही शालेय फोटो नुकतेच शेअर केले आहेत आणि ते सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. साक्षी आणि अनुष्का या शालेतया मैत्रिणी आहेत. अनुष्काचे वडील लष्करी अधिकारी आहेत. त्यांची बदली आसाममधील एका गावी झाली तेव्हा अनुष्का ज्या सेंट मेरी स्कूल मध्ये होती तेथेच साक्षी अगोदरपासूनच शिक्षण घेत होती. तिथे त्या दोघींची चांगली मैत्री होती.

मात्र नंतर फारसा संबंध राहिला नाही त्यामुळे हि मैत्री तशी गुपित राहिली. पण जेव्हा दोघी एकमेकीना भेटल्या आणि तुझी शाळा कुठली, माझी कुठली याची चौकशी झाली तेव्ह्या दोघींना आपण बालपणीच्या मैत्रिणी आहोत हे कळले. अनुष्काने हि आठवण एका मुलाखतीत सांगताना त्यावेळचे फोटो शेअर केले आहेत.

Leave a Comment