तेव्हा लुप्त होणार केदारनाथ आणि बद्रीनाथ

kedar
केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि जामुनोत्री हि हिंदू भाविकांसाठी अतिशय पवित्र अशी तीर्थस्थाने आहेत. हिमालयाच्या कुशीत उंच पहाडांवर असलेली हि ठिकाणे. दरवषी लाखो भाविक या ठिकाणी भेट देतात. केदारनाथ येथे येणाऱ्या भाविकांना साक्षात स्वर्गात आल्याची अनुभूती मिळते असे सांगितले जाते. पौराणिक कथानुसार जेव्हा नर आणि नारायण हे पर्वत एकत्र होतील तेव्हा केदार आणि बद्री हि स्थाने लुप्त होतील आणि भविष्यात भविष्य बद्री येथे पुन्हा नवी तीर्थस्थाने निर्माण होतील.

केदारनाथ अति प्राचीन तीर्थस्थान असून १३ ते १७ शतकात म्हणजे ४०० वर्षे ते बर्फात दबले गेले होते. एकीकडे २२ हजार फुट उंचीचे केदार, २१६०० फुट उंचीचे खर्चकुंद आणि २२७०० फुट उंचीचे भरतकुंड या पहाडांमध्ये हे स्थान आहे. येथे पंचनदी संगम आहे. मंदाकिनी, मधुगंगा, क्षीरगंगा, सरस्वती आणि स्वर्णगौरी अश्या या पाच नद्या आहेत. ४०० वर्षे हे मंदिर बर्फात दबले होते तरी त्याला काहीही नुकसान झाले नव्हते. १३ ते १७ शतक काळात छोटे हिमयुग आल्याने हे घडले होते. मंदिराच्या भिंतीवर आजही त्या खुणा पाहायला मिळतात.

अतिशय मजबूत दगडी बांधकाम असलेले हे मंदिर मूळ पांडवानी बांधले होते. मात्र ते लुप्त झाल्यावर आदि शंकराचार्य यांनी त्याची पुन्हा उभारणी केली. येथेच मागे शंकराचार्य समाधी आहे. १० व्या व १३ व्या शतकात त्याचा जीर्णोद्धार केला गेला आहे. मंदिराचा भिंती १२ फुटी असून संपूर्ण दगडात हे मंदिर बांधले गेले आहे. ८५ फुट उंच, १८७ फुट रुंद असलेले हे मंदिर ८० फुट रुंदीच्या खांबांवर बांधले गेले असून सर्व चिरे इंटरलॉक पद्धतीने जोडले गेले आहेत. यामुळेच येथे काही वर्षापूर्वी येऊन गेलेल्या प्रलायतही मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही असे सांगितले जाते.

Leave a Comment