जगातील सर्वात मोठी भगवद गीता

geeta
इटलीच्या मिलान शहरात तयार करण्यात आलेली जगातील सर्वात मोठी भगवद गीता समुद्रमार्गे भारतात पोहोचली असून ती दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात ठेवली जात आहे. इस्कॉन संस्थेनेच हि गीता तयार करून घेतली असून तिचे लोकार्पण १५ फेब्रुवारीला दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

bhagvad
ही भगवद गीता १२ फुट लांब, ९ फुट रुंद असून तिचे वजन ८०० किलो आहे. यात ६७० पाने असून एक पान उलटायला चार माणसांची मदत लागते. या पुस्तकासाठी सिंथेटिक कागद, सोने, चांदी, प्लॅटीनम धातूंचा वापर केला गेला आहे. ती बनविण्यासाठी दीड वर्षे लागली आणि त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला. इस्कॉनचे प्रमुख आचार्य श्रीमद एसी भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपद यांनी या गीतेची निर्मिती गीता प्रसाराचे कार्य सुरु केल्याला ५० वर्षे झाली त्यानिमित्ताने केली असे समजते.

Leave a Comment