सारा अली खान ‘लव आज कल २’ सोडला ?

sara-ali-khan
‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सारा अली खानने पदार्पण केले. प्रेक्षकांची तिच्या या चित्रपटाला आणि अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली. ती आता ‘लव आज कल २’ चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे वृत्त आहे.

कार्तिक आर्यन आणि सैफ अली खान सुद्धा सारासोबत पाहायला मिळणार असल्याची चर्चा होत आहे. पण चित्रपटातून सारा आणि सैफ यांनी काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची स्क्रिप्ट साराला पसंत न आवडल्यामुळे तिने हा चित्रपट सोडला आहे.

एका मुलाखतीत साराने म्हटले होते की, चित्रपटात वडिलांसोबत काम करण्याची माझी ईच्छा आहे. पण भूमिका चांगली असायला हवी. फक्त नावापूरताच मी चित्रपट नाही करु इच्छित. आता त्यामुळे बाप लेकीच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Comment