सावरकरांच्या वारसांपासून देशाच्या स्वातंत्र्याला वाचवण्याची गरज – ओवेसी

Owaisi
नवी दिल्ली – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सावरकरांच्या वारसदारांपासून देशाच्या स्वातंत्र्याला वाचवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. नेहमीच भाजप आणि आरएसएसवर ओवेसी कठोर शब्दांत टीका करतात.

मोठ्या संघर्षांनंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आता सावरकरांच्या वारसदारांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी हमला हा गोडसेने केला असल्याचेही ते म्हणाले. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची गोळी घालून नथुराम गोडसेने हत्या केली होती. या प्रकरणी ९ आरोपींवर खटला चालला होता. आरोपी गोडसे आणि नारायण आपटेला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती.

Leave a Comment