माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा

sara-ali-khan
अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच हिट सिनेमा दिले. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ हे तिचे चित्रपट नुकतेच प्रेक्षांच्या भेटीला आले होते. या चित्रपटांच्या माध्यमातून तिने तिचे चाहते आणि प्रेक्षकांची मने जिंकली. नुकतेच तिने एका कार्यक्रमात मुलाखती दरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील काही घटनांचा उलघडा केला आहे.
sara-ali-khan1
फिल्मफेअला दिलेल्या मुलाखतीत सारा अली खानने तिच्या लव्ह लाईफबाबतचा खुलासा केला आहे. साराला विचारण्यात आले की तू सिंगल आहे कि नाही ?, यावर ती म्हणाली ”होय, मी सिंगल आहे. मी कोणालाही डेट करत नाहीये. मी फक्त वीर पहारियाला डेट केले आहे.” वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

साराने काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. साराने अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. त्यानंतर ती रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’मध्ये दिसली होती.

Leave a Comment