‘या’ पोस्टमुळे सुष्मिता सेन झाली ट्रोल

Sushmita-Sen
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असते. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, अलिकडेच तिने लग्नाबाबत एक पोस्ट शेअर केली. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

View this post on Instagram

😅👊 #marriage #strategy #cushandwizdom 😎❤️

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on


सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर लग्नाबाबत एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने लिहिले होते, की ‘ज्यानेही लग्नाचा शोध लावला आहे तो खरच भयानक आहे. जसे की तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आता यामध्ये मी सरकारचाही समावेश करणार आहे, जेणेकरून तू मला सोडून जाणार नाही’.


या पोस्टनंतर सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी तिला ट्रोल केले. ट्रोलिंगनंतर सुष्मिताने पुन्हा एक पोस्ट शेअर करून ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. ‘कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा आपला आपला दृष्टीकोन असतो’, असे लिहीत तिने एक विनोदी पोस्ट शेअर केली आहे.

Leave a Comment