
मुंबई – राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण याबाबत दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने अद्याप दुजोरा दिला नसला तरी नेते यावर भाष्य करताना दिसत आहेत. राज ठाकरे आघाडीत आले तर फायदाच होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरेंना आघाडीत घेण्याला छगन भुजबळ यांनी समर्थनच दिले आहे.
राज ठाकरे आघाडीत आले तर फायदाच – छगन भुजबळ
जागावाटपाची राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरु आहे का असे विचारले असता आपल्याला यासंबंधी कोणतीही माहिती नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. पण आघाडीत राज ठाकरे आले तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नक्कीच फायदा होईल असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, आघाडीसाठी आगामी निवडणूक महत्त्वाची असून प्रत्येक मताची गरज आहे. मोदी सरकारच्या विरोधात राज ठाकरे असून त्यांच्यामागे हजारो मते असल्यामुळे आघाडीला त्याचा नक्की फायदा होईल.
