आता पेटीएमच्या माध्यमातून करा हॉटेल्सचे बुकिंग

paytm
नवी दिल्ली – वॉलेट कंपनी पेटीएमच्या ग्राहकांना लवकरच अॅपच्या माध्यमातून हॉटेल्सचे बुकिंग करता येणार आहे. पेटीएमने यासाठी ‘नाइट स्टे’ हे प्रसिद्ध हॉटेल बुकिंग अॅप विकत घेतले आहे. पेटीएम कंपनीने आपल्या नव्या व्यवसायात तब्बल ५०० कोटी रुपये गुंतवले असून अधिक तत्परतेने ग्राहकांना हॉटेल बुकिंग करता यावे असा कंपनीचा मानस असणार आहे.

जवळपास पाच हजारांहून अधिक लक्झरी आणि स्वस्त दरातील हॉटेल्सचे बुकिंग या अॅपद्वारे पहिल्या टप्प्यात करता येणार आहे. नंतर हॉटेल्सचा आकडा वाढत जाणार आहे. बुकिंग साइट लाँच झाल्यानंतर काही काळात ५० हजार नवीन हॉटेल्स या अॅपद्वारे जोडली जातील अशी माहिती पेटीएमने दिली आहे. आपल्या बजेटनुसार वेगवेगळे हॉटेल्स ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा पेटीएमचा प्रयत्न असणार आहे. कंपनीने सरोवर, जूरी, ट्रीबो, इंडियो हॉटेल कंपनी जिंजर, स्टर्लिंग वीरिसॉर्ट्स सारख्या हॉटेल्स चेनशी भागीदारी केली असल्याचे समजत आहे.

Leave a Comment