‘हेराफेरी 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Herapheri

मुंबई – कॉमेडी चित्रपट ‘हेराफेरी 3’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हेराफेरी’ या चित्रपटात परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टी यांच्या तिहेरी जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ‘हेराफेरी 3’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला येत आहे.

‘हेराफेरी’च्या यशानंतर दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दुसऱ्या भागानेही प्रेक्षकांवर छाप पाडली होती. याच्या तिसऱ्या भागाचीही बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. आता दिग्दर्शक इंद्र कुमार या चित्रपटाचा तिसरा भाग तयार करणार आहेत. चित्रपटाची स्क्रिप्टही तयार करण्यात आली आहे. इंद्र कुमार सध्या ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटानंतर लगेचच ‘हेराफेरी 3’ च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

Leave a Comment