या रेस्टॉरन्टमध्ये चुकूनही नेऊ नका पत्नीला, होईल फसगत !

anand-mahindra
जगभरातील हॉटेल्स व्यावसायिक आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांची रेलचेल कायम रहावी यासाठी आपल्या मेनूमध्ये आगळ्या वेगळ्या पदार्थांचा समावेश करतात. पण काहीवेळा हे पदार्थ असे असतात की त्यांचा कितीही डोके लावले तरी अर्थ लागत नाही. सध्या सोशल मीडियात असाच एक पदार्थ व्हायरल होत आहे. या पदार्थाबाबतची माहिती देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद मंहिद्रा यांनी ट्विट करून दिली आहे. या पदार्थाची तेव्हापासून चर्चा रंगली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये चीनमधील एका रेस्टॉरन्टचे मेन्यू कार्ड दाखवले आहे. यात एका पदार्थाचे नाव Delicious roasted hudband म्हणजेच ‘स्वादिष्ट भाजलेला पती’ असे लिहिले आहे.


अर्थातच जगभरातील पतींची या पदार्थाच नाव वाचल्यावर भंबेरी उडाली असणार. याबाबत स्वत: आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, या रेस्टॉरन्टमध्ये ते पत्नीसोबत जाण्याआधी अनेकदा विचार करतील, कारण तिला कोणतीही क्रिएटीव्ह आयडिया मला द्यायची नाहीये. हे मेन्यू कार्ड आता व्हायरल झाले असून यावर लोक वेगवेगळे जोक्स करत आहेत. पण आता प्रश्न असा पडतो की, या डिशमध्ये काय दिले जात असेल ? असे का नाव या पदार्थाला दिले असेल? पण अद्यापही याचे उत्तर मिळालेले नाही.

Leave a Comment