
मथुरा : काँग्रेस तर्फे राष्ट्रीय सरचिटणीसपदी प्रियंका गांधी यांची निवड करण्यात आली असून सक्रीय राजकारणात प्रियंका गांधी आल्यापासून सर्वत्र त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. यातच प्रियंका गांधी आणि काँग्रेसवर भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) काही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
प्रियंका गांधींवर टीका करणा-या भाजप नेत्यांना हेमा मालिनी यांनी झापले
जास्तकरुन भाजपच्या नेत्यांनी प्रियंका गांधी यांच्या चेहऱ्यावरुन टिप्पणी केली आहे. दरम्यान, अशाप्रकारे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पार्टीच्या नेत्यांना अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. तसेच, अशी विधाने किंवा सेक्सिस्ट कॉमेंट्स करण्याऱ्या लोकांना राजकारणात कोणतेच स्थान नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी यांच्याबाबत भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कैलास विजयवर्गीय म्हणाले की, काँग्रेसकडे चेहराच नसल्यामुळे काँग्रेसकडून आता चॉकलेटी चेहरे समोर आणले जात आहेत. कधी काँग्रेसकडून सलमान खान निवडणूक लढणार असल्याची अफवा पसरवली जाते, तर कधी करीना कपूर निवडणुक लढणार असल्याच्या चर्चा रंगतात. तर कधी प्रियंका गांधीना राजकारणात आणले जाते. असे विवादित वक्तव्य केले होते.
