मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार शहीद औरंगजेबचे वडील

Aurangzeb
जम्मू-काश्मीर- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलेल्या शहीद औरंगजेबचे वडील मोहम्मद हनिफ भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 3 फेब्रुवारीला जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक महारॅली होणार आहे. मोहम्मद हनिफ या रॅलीदरम्यान भाजपत सामील होणार आहे. 14 जून 2018 रोजी दहशतवाद्यांशी लढताना रायफलमॅन औरंगजेब हा जवान शहीद झाला. त्यानंतर औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र देण्यात आले.

औरंगबेज यांच्या शौर्याचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा शौर्य चक्र देऊन सन्मान करण्यात आला. याबद्दलची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला झाली होती. औरंगजेब यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण आले होते. दहशतवाद्यांनी ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचे अपहरण केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला त्यांचा मृतदेह सापडला होता. औरंगजेब जम्मू-काश्मीर लाईट इन्फंटरीच्या शादीमार्ग येथे असलेल्या 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते.

Leave a Comment