अविवाहीत एकता कपूर बनली आई !

ekta-kapoor
तुषार कपूरची बहीण एकता कपूर आई बनली आहे. एकता कपूरने लग्न न करता सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला आहे. एकता कपूर २७ जानेवारीला आई बनली.

मिळलेल्या माहितीनुसार, तिचा मुलगा एकदम स्वस्थ असून लवकरच त्याचे घरी आगमन होणार आहे. तीन वर्षांपूर्वी तुषार कपूर सरोगसीद्वारे पापा बनला होता. त्याच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे. काही दिवसांपूर्वी एकताने लग्न न करता आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. बाळाची जबाबदारी उचलण्यास मी एकदम तयार आहे. पण लग्नाचा मात्र माझा विचार नाही, असे एकता म्हणाली होती.

एकता कपूरला टीव्ही इंडस्ट्रीची ‘क्वीन’ म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत एकता कपूरने ४० पेक्षा अधिक मालिका व चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. तिच्या नावावर २० पेक्षा अधिक हिट मालिका आहेत. पण हम पांच , क्यों की सांस भी कभी बहू थी , कसौटी जिंदगी की , कहानी घर घर की आणि नागीन या पाच मालिकांनी एकताला ‘टीव्हीची क्वीन’ बनवले.

सरोगेसीद्वारे आई-बाबा बनलेले अनेक कपल बॉलिवूडमध्ये आहेत. शाहरूख खान, आमिर खान, सनी लिओनी, सोहेल खान, कृष्णा अभिषेक असे सगळे स्टार्स सरोगसीद्वारे पालक बनले आहे.

Leave a Comment