विकी कौशलला असे मिळाले सरप्राईज

kaushal
उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटामुळे रसिकांच्या हृदयात स्थान मिळालेल्या विकी कौशल या अभिनेत्याला नुकतेच एक सरप्राईज मिळाले. विकीचा या सिनेमातील – हाऊज द जोश- हा डायलॉग आज प्रत्येकाच्या जिभेवर आहे. विकी जेट एअरवेजने प्रवास करत असताना विमानातील स्टाफने त्याला केक दिला आणि त्यासोबत एक चिट्ठी. हा दिवस होता प्रजासत्ताक दिन. चिट्ठीत हाऊज द जोश आणि प्रजासत्तक दिनाच्या शुभेच्छा असा मजकूर होता. विकिला हे सरप्राईज खूप आवडले यात विशेष ते काय?

jetair
उरी, द सर्जिकल स्ट्राई या चित्रपटाला रसिकांनी भरभरून पसंती दिलीच पण त्यातील हिरो विकी कौशल त्यामुळे खूपच लोकप्रिय झाला. रसिकांना हा चित्रपट खूपच भावला. २०१६ साली उरी येथील सैनिक ठाण्यावर पाकिस्तानी हल्ला झाला त्याचा जबाब भारताने कसा दिला हे दाखविणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला आहे. विकीने त्याला सरप्राईज म्हणून मिळालेल्या केकचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Leave a Comment