या तलावात होते साक्षात विष्णुदर्शन

nilkanth
नेपाळची राजधानी काठमांडू पासून १० किमीवर असेलेले शिवपुरी हे स्थान म्हणजे साक्षात विष्णू दर्शन होणारे ठिकाण आहे. येथे बुढनीलकंठ मंदिर सुंदर आणि प्रचंड मोठे आहेच पण येथे शेषशाई विष्णूची अतिशय सुंदर प्रतिमा तलावात आहे. हि मूर्ती अतिशय देखणी आणि भव्य म्हणजे १६ फुटी आहे.

vishnu
१३ मीटर म्हणजे साधारण ४० फुट लांबीच्या तलावात विष्णूची हि १६ फुटी मूर्ती शयनावस्थेत आहे. हा तलाव ब्रह्मांड समुद्राचे प्रतिक मानला जातो. विष्णू मूर्ती शेष नागावर झोपलेली असून नागाचे फडे मूर्तीच्या डोक्याभोवती आहेत. विष्णू चतुर्भुज आहे आणि त्याच्या एका हातात मनाचे प्रतिक चक्र, दुसऱ्या हातात चार तत्वांचे प्रतिक असा शंख, तिसऱ्या हातात ब्रह्मांडाचे प्रतिक कमळ तर चौथ्या हातात ज्ञानाचे प्रतिक म्हणून गदा आहे.

kathmandu
या तलावात महादेवाचा वास आहे असा भाविकांचा विश्वास आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये येथे वार्षिक शिवउत्सव साजरा होतो तेव्हा पाण्याखाली शिवाची प्रतिमा दिसते असे सांगितले जाते. या तलावात येणारे पाणी गोसाई कुंडातून येते. असे सांगतात समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष महादेवाने प्राशन केले तेव्हा त्याचा घसा जळजळू लागला तेव्हा त्याने काठमांडूच्या उत्तर सीमेवर सरोवर बनविण्यासाठी पहाडावर त्रिशुळाने वार केला आणि त्या पाण्याने तहान भागविली. तेच गोसाई कुंड म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment