5G तंत्रज्ञानाच्या लाँच नंतर कसे बदलेल जग !

technology
मोबाईल फोनच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली नाही जितकी 5G तंत्रज्ञानाची केली जात आहे. मोबाईल फोन ऑपरेटर, हँडसेट निर्माते आणि उपकरणे विक्रेते हा ग्राउंड ब्रेकिंग तंत्रज्ञान वापरण्यासाठी इच्छुक आहे. परंतु, या सोबतच बऱ्याच गोष्टी पणाला लागल्या आहेत.

मोबाईल उद्योगाला ही 5 जी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. याद्वारे, त्यांना नवीन उपादन स्रोत, भांडवल, शेअर मार्केटला प्रोत्साहित करायचे आहे. 1980 च्या दशकाच्या मध्यात मोबाईल फोन आला आणि तेव्हापासून मोबाईल क्षेत्रात नेटवर्क आणि तंत्रज्ञानाचे अनेक नवीन तंत्रज्ञान लाँच झाले आहे.

यानंतर, 3 जी ने 2000 मध्ये चांगल्या सुविधा आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यास सुरवात केली. 2010 च्या दशकात लोकांना 4 जी सुविधाचा लाभ घेतला.

2020 मध्ये आता पाचवी जनरेशन टेक्नोलॉजी 5 जी तंत्रज्ञान लाँच करण्यात येणार आहे.  परंतु, त्याचे काम इतके जलद होत आहे की, 2019 च्या पहिल्या तिमाहीत 5 जी फोन बाजारात येतील.

असे सांगितले जात आहे की, एचडी चित्रपट एका मिनिटापेक्षा कमी वेळेत डाउनलोड होईल. यूजर्ससाठी 5 जी चा वेग लक्षणीय असेल,  4 जी पेक्षा हजार पट वेगवान असल्याचे म्हटले जाते. सुरुवातीच्या 5 जी फोनची किंमत 600 पौंड (सुमारे 60 हजार रुपये) असू शकते.

Leave a Comment