ममता बॅनर्जी ‘तालिबानी’ दिदी सारख्या वागत आहेत – संबित पात्रा

sambit-patra
नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर येथून अमित शहांच्या रॅलीतून परत येत असताना भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘तालिबानी’ दिदी सारख्या वागत आहेत, असे म्हटले आहे.

वाहनांवर ज्याप्रकारे दगडफेक करण्यात आली. वाहनांना आग लावण्यात आली. यावरून पश्चिम बंगालमधील सद्यस्थिती दिसून येते. ममता बॅनर्जींचा हा खरा चेहरा असल्याचे पात्रा म्हणाले. ही कुठल्या प्रकारची वागणूक आहे. ‘तालिबानी’ दिदी सारख्या तुम्ही वागत आहात, असेही पात्रा म्हणाले. भाजपला राज्यात मिळणारा प्रतिसाद बघून ममता घाबरल्या असल्याचेही पात्रा म्हणाले.

ममतांच्या नेतृत्वाखाली तालिबान्यांचे प्रस्थ बंगालमध्ये वाढत आहे. हे पुन्हा एकदा आजच्या घटनेने अधोरेखित झाले असल्याचेही ते म्हणाले. बंगालमध्ये सीबीआयला तुम्ही येऊ देत नाही. भाजपच्या नेत्यांना तुम्ही राज्यात रॅली करू देत नाही. तुम्ही लष्कर आणि बीएसएफवर शंका घेता. तुम्ही राज्यात कुठल्याही लोकशाही पद्धतीनुसार काम करत नाही. ही लोकशाही आहे का?, असा सवालही पात्रा यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Comment