विवाह सोहळ्यात संगीत वाजल्याने काझीचा बहिष्कार

m

लग्न सोहळ्यात संगीत वाजल्यामुळे विवाह सोहळा पार पाडायला काझीने नकार दिल्याची घटना मंगळवारी घडली. हा काझी झारखंडमधील झाबुआ जिल्ह्याचा रहिवासी आहे.

या ठिकाणी काझींनी गेल्या अडीच वर्षांपासून लग्न प्रसंगी ढोल, डीजे आणि संगीत यावर बंदी घातली आहे. इस्लाममध्ये केवळ गायन मंजूर (हलाल) आहे आणि वाद्ये वाजविण्यास मनाई आहे (हराम) असे मौलवींचे म्हणणे आहे.

“जेथे संगीत आणि नाच-गाणे असेल आणि डीजे असतील तेथे आम्ही विवाहांमध्ये निकाह करणार नाही. हे सर्व गैर-इस्लामी असल्यामुळे आम्ही आमच्या समाजात अशा गोष्टीवर बंदी घातली आहे. ढोल, संगीत आणि डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वी सर्वांनी घेतला होता. मी या संदर्भात नवरदेवाच्या कुटुंबियांशीही बोललो परंतु त्यांनी ही पद्धत मोडायचे ठरविले. त्यानंतर या भागातील सर्व काझींनी बहिष्कार घातला असल्याचे मी जाहीर केले,” असे काझी हाजी हरून रशीद यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

या काझीच्या नकारानंतर काही तासांनी वधू आणि वराच्या कुटुंबियांनी शेजारच्या राजघाड येथील काझींना बोलावले. त्यानंतर हा विवाह पार पडला. मात्र या कुटुंबियांनी शेजारच्या गावातील काझींना बोलावल्यानंतर झाबुआच्या काझींनी कोतवाली पोलिस ठाण्यात या परिवाराच्या विरोधात तक्रार दाखल केली, असे झाबुआच्या एसडीओपी ऐश्वर्या शास्त्री एएनआयला सांगितले.

या बंदीबद्दल त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करत असताना वऱ्हाडी मंडळींनी आपल्याशी गैरवर्तन केले, असा आरोप या काझींनी तक्रारीत केला आहे.

Leave a Comment