आजपासून अण्णा हजारेंचे लोकपाल अन् हमीभाव या मागण्यांसाठी उपोषण

anna-hazare
अहमदनगर – आजपासून पुन्हा एकदा समाजसेवक अण्णा हजारे बेमुदत उपोषण आंदोलनावर जाणार आहेत. अण्णा हजारे लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत

आज सकाळी १० वाजता यादवबाबांचे दर्शन घेऊन आंदोलनाला होणार सुरुवात करण्यात येणार आहे. अण्णा हजारे यादवबाबा मंदिराबाहेर उभारलेल्या व्यासपीठावरून पुन्हा जय हिंद…इन्कलाब जिंदाबादचा हुंकार देतील. देशभरातून अण्णा हजारे यांचे समर्थक या आंदोलनात सहभागी होण्याआठी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी राळेगणसिध्दीमध्ये ग्रामस्थ एकजुटले आहेत.

Leave a Comment