अजयच्या ‘तानाजी’मध्ये झळकणार काजोल

ajay-devgan
सध्या आगामी ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या चित्रपटामुळे बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण चर्चेत आहे. तो या चित्रपटात एका मराठा योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. तो मराठी योद्धा दुसरा कुणी नसून शिवरायांचा सिंह सुबेदार तानाजी मालुसरे आहे. तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय देवगण मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण प्रेक्षकांना या चित्रपटात आणखी एक सप्राईज मिळणार आहे. अजय देवगण सोबत या चित्रपटात काजोलही दिसणार आहे, तेही तानाजी यांच्या पत्नीच्या भूमिकेत.

अजय देवगण हा या चित्रपटात शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि सुबेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. काजोल या चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. यासाठी काजोलने एक गाणे देखील शूट केल्याचे वृत्त आहे. काजोल आणि अजय देवगण यांची जोडी नेहमी हिट ठरली आहे. ते मग चित्रपटांमध्ये असो किंवा खऱ्या आयुष्यात. या दोघांनी आजवर ‘राजू चाचा’, ‘प्यार तो होना ही था’, ‘यू मी और हम’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने 12 वर्षांनंतर अजय देवगण आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एका चित्रपटात दिसणार आहेत. याआधी त्यांनी ओमकारा या चित्रपटात सोबत काम केले होते. हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2019 ला रिलीज होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment