
अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव ही ‘मामि’ची अध्यक्ष होती. त्यानंतर दीपिका आता या पदाची जबाबदारी पार पाडणार आहे. दीपिकाने निवड झाल्यानंतर साऱ्यांचे आभार मानले.
दीपिका पादुकोणची ‘मामि’च्या अध्यक्षपदी नियुक्ती
सध्या आपल्या आगामी चित्रपटांमध्ये किरण राव व्यस्त असल्यामुळे अध्यक्ष पदाचा तिला राजीनामा द्यावा लागला. काही दिवसांपूर्वी मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या सदस्य मंडळाची किरणच्या राजीनाम्यामुळे बैठक पार पडली. अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी या बैठकीमध्ये वोटिंग करण्यात आले. दीपिका यामध्ये सर्वाधिक मत मिळवून विजयी झाली. या पदी निवड दीपिकाची झाल्यानंतर किरणने तिला शुभेच्छाही दिल्याचे पाहायला मिळाले.
दीपिका ‘मामि’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नक्कीच या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडेल. तिच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत, असे किरण म्हणाली. दरम्यान, सध्याच्या घडीला दीपिका बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट गेल्या वर्षभरापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहेत. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाचा प्रत्येक चित्रपट हिट ठरत असून संजय लिला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. दीपिका लवकरच अॅसिड हल्लापिडीत लक्ष्मी अगरवाल हिच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.
