भाजप आमदाराने राहुल-प्रियंकांची केली रावण-शूर्पणखेशी तुलना

surendra-singh
बलिया – प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्याची घोषणा केल्यापासून त्यांच्यावर भाजपकडून मोठ्याप्रमाणात शाब्दिक हल्ले होताना दिसत आहे. आता उत्तर प्रदेशमधील बलिया मतदारसंघाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. प्रियंका गांधींना त्यांनी शूर्पणखा म्हटले आहे तर राहुल गांधींची तुलना रावणाशी केली.

त्यांना प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. सुरेंद्र सिंह त्यावर म्हणाले की, राम आणि रावण यांचे जेव्हा युद्ध होणार होते. रावणाने त्यावेळी आधी आपल्या बहिणीला पाठवले होते. आता रामाच्या भूमिकेत मोदी आणि रावणाच्या रूपात राहुल आहेत. शूर्पणखाच्या रूपात त्यांनी आपली बहीण प्रियंका यांना मैदानात उतरवले आहे. आता आम्ही लंकेवर विजय मिळवला असे समजा. काँग्रेस पक्ष ही तुटलेली नाव आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांना विजय फक्त एससी/एसटी अॅक्टमुळे मिळाला आहे. आता त्यांना कुठेही चंदन लागणार नाही, असा टोलाही लगावला.

Leave a Comment