
पाटणा – आपल्या लाडक्या राजकीय पुढा-यांचे समर्थक त्यांना नेहमीच देवीदेवतांच्या भूमिकेत सादर करत असतात. निवडणुकांच्या तोंडावर हे विशेषत: पाहायला मिळते. राहुल गांधी यांना भगवान राम यांच्या वेशभूषेत दाखवणारे पोस्टर बिहारच्या पटनामध्ये लागले आहेत.
बिहारमध्ये चक्क प्रभु श्रीरामचंद्रांच्या वेशात अवतरले राहूल गांधी
भगवान राम आणि अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा समोर येत आहे. मतांचे ध्रुवीकरण या मुद्द्यांवरून करत येत असल्यामुळे याचा फायदा प्रत्येक राजकीय पक्ष घेतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांना काही दिवसांपूर्वी भगवान शंकरांच्या वेषात दाखवणारे पोस्टर्सही लागले होते. राहुल हे खरे शिवभक्त आहेत, असा मजकूर त्या पोस्टर्सवर दिसून येत होता.
