किमान वेतनाच्या घोषणेनंतर महिला आरक्षण विधेयक करणार संमत – राहुल गांधी

rahul-gandhi1
कोचीन – केरळमध्ये एका रॅलीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसचा महिला आरक्षण विधेयक संमत करणे हा पहिला प्राधान्यक्रम राहील, असे राहुल यांनी म्हटले आहे. तसेच, जास्तीत जास्त महिला आणि तरुणांना प्रत्येक निवडणुकीत निवडणूक लढविण्याची संधी देण्यात येईल, असे ते म्हणाले.

राजकारणाच्या रिंगणात अधिकाधिक महिलांनी उतरावे, निवडणूक लढवावी हा काँग्रेसचा अजेंडा आहे. यासाठी २०१९ च्या निवडणुका जिंकल्या तर आम्ही महिला आरक्षणाचे विधेयक संमत करू. आम्हाला महिलांचे नेतृत्व हवे असल्याचे राहुल यांनी म्हटले. एकामागोमाग एक खोटे बोलण्यात नरेंद्र मोदींनी जनतेची ५ वर्षे फुकट घालविली. २ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यांनी त्यांच्या १५ मित्रांना जास्तीत जास्त पैसा कमवण्याची संधी दिली. तुम्ही अनिल अंबानी असाल, तर तुम्हाला सर्वाधिक पैसा मिळणारच. याउलट, आम्ही सर्वच भारतीयांना किमान वेतन मिळवून देण्याचे वचन देत आहोत. मोदींनी शेतकऱ्यांविरोधात जेवढी चुकीची धोरणे राबवली, ती सर्व आम्ही सत्तेत आल्यास ठीक करू. आम्ही तीन राज्यांमध्ये सत्ता आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्याचप्रमाणे आम्ही २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करू,’ असे गांधी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment