येतोय सॅमसंगचा बाप फोन- एस १० प्लस

s10plus
द.कोरियन इलेक्ट्रोनिक कंपनी सॅमसंग त्यांच्या एस सिरीज मधील बाप स्मार्टफोन बार्सिलोना येथे २० फेब्रुवारी पासून सुरु होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये सादर करणार असून त्याचा टीझर व्हिडीओ आला आहे. गॅलेक्सी एस १० व एस १० प्लस असे हे फोन फोन यावेळी सादर होतील त्यातील एस १० प्लसची काही फिचर लिक झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एस १० ला ५.८ इंची तर प्लसला ६.४ इंची डिस्प्ले दिला जात आहे. एस १० प्लसचा डिस्प्ले इन्फिनिटी ओ डिस्प्ले असून या डिस्प्लेवर उजवीकडे एक होलपंच असून त्यात सेल्फी कॅमेरा युनिट दिले गेले आहे. या फोनला १२ जीबी रॅम आणि १ टीबी इंटर्नल स्टोरेज दिले गेले आहे. ड्युअल सेल्फी कॅमेरे आहेत शिवाय रिअरला ट्रिपल कॅमेरे दिले गेले आहेत. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि सी ग्रीन कलरमध्ये मिळणार आहे. हा फोन ८ मार्च ला अधिकृतरीत्या लाँच केला जाईल असेही समजते.

Leave a Comment