प्रियांका गांधी सोशल मिडीयावर होणार अॅक्टीव

social
प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे आणि त्यांच्या या प्रतिमेचा कॉंग्रेस लाभ उठविणार असून प्रियांका लवकरच फेसबुक आणि ट्विटर वर येणार आहेत. प्रियांका आत्तापर्यंत सोशल मीडियापासून दूर होत्या मात्र ५० कोटी जनतेपर्यंत वेगाने पोहोचण्याचा मार्ग सोशल मिडियाच्या रस्त्याने जाणार हे ओळखून त्या सोशल मिडीयावर येत आहेत असे समजते.

४ फेब्रुवारीला लखनौ येथे होत असलेल्या एका भव्य कार्यक्रमात प्रियांका गांधी कॉंग्रेस महासचिव पदभार स्वीकारणार आहेत. उत्तर प्रदेशातील महिला आणि युवक यांच्या बरोबर संपर्कासाठी त्या सोशल मिदियाव्हा वापर करणार आहेत. भाजपप्रमाणेच कॉंग्रेसने सोशल मिडिया सेल बनविले असून त्यांचे बरेचसे नेते फेसबुक आणि ट्विटरवर सक्रीय आहेत. त्यात राहुल गांधी यांनी आघाडी घेतली आहे.

प्रियांका यांच्या सोशल मिडिया अकौंटची जबाबदारी कॉंग्रेसच्या सोशल मिडिया व डिजिटल कम्युनिकेशन प्रमुख दिव्या स्पंदना यांच्याकडे आहे. प्रियांका यांच्या भाषणासाठी युट्युब चॅनल सुरु केला जाणार असून त्यावर त्यांची भाषणे लाइव दिसणार आहेत असेही समजते. प्रियांका यांचे फेसबुक अकौंट प्रथम सुरु होईल आणि नंतर ट्विटर अकौंट सुरु होणार आहे.

Leave a Comment