नसिरुद्दीन शाह, आमिर खान आणि सिद्धू हे गद्दार आहेत : इंद्रेश कुमार

indresh-kumar
अलीगड : बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह, अभिनेता आमिर खान आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी गद्दार म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्या तिघांची तुलना बंगालचा नजाफी नवाब मीर जाफर आणि धोकेबाज म्हणून ओळख असलेला राजपूत राजा जयचंद यांच्याशी केली आहे. इंद्रेश कुमार यांनी अलीगड येथे माध्यमांशी बोलताना या तिघांना गद्दार संबोधले आहे.

नसिरूद्दीन शाह, आमिर खान हे दोघे चांगले अभिनेते असतील. पण ते सन्मानास पात्र नसल्यामुळेच ते गद्दार आहेत. मीर जाफर आणि जयचंद यांच्यासारखे ते गद्दार आहेत, असल्याचे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. कुमार एवढ्यावरच थांबले नाही पुढे ते म्हणाले की, अजमल कसाबसारख्या युवकांची नव्हे तर दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तींची आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्यांची भारताला गरज आहे.

इंद्रेश कुमार म्हणाले की, अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला काँग्रेस, डावे पक्ष, धार्मिक शक्ती आणि काही न्यायाधीशांमुळे उशीर होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसमुळेच राम मंदिरास विलंब होत आहे.

Leave a Comment