चक्क एका छोट्याशा स्क्रुसाठी अ‍ॅपलने 2017 मध्ये चीनला दिले तब्बल 11 लाख कोटी

apple
न्युयॉर्क : अमेरिकेतील गरजेच्या उत्पादनांमध्ये अ‍ॅपलच्या मॅकबूक आणि कॉम्प्युटरसाठी लागणारे स्क्रू हे येत नसल्याने चीनला ते बनवावे लागत आहेत. एवढे छोटे स्क्रू अमेरिकेत मिळत नसल्याने मॅकबूक आणि कॉम्प्युटर बनविण्याचा प्लांट अ‍ॅपलला चीनमध्ये हलवावा लागल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे.

अ‍ॅपलने 2017 मध्ये चीनला या छोट्याशा स्क्रूमुळे तब्बल 11 लाख कोटींचा व्यवसाय दिला. अमेरिकेतील कुशल कामगार आणि खर्च ही कारणेदेखील यामध्ये आहेत. स्क्रू अमेरिकेमध्ये बनत नसल्याने अ‍ॅपलला काही महिने आयफोन आणि कॉम्प्युटरच्या विक्रीला थांबवावे लागले होते. अ‍ॅपलने भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी अमेरिका सोडण्याचा निर्णय घेत हा व्यवसाय थेट चीनला वळविला. यासाठी पुढील काळात अ‍ॅपल भारत आणि व्हिएतनामसारख्या देशांवर लक्ष ठेवून आहे. आपली उत्पादने बनविण्यासाठी चीनमध्ये अ‍ॅपलने मोठमोठे कारखाने उघडले आहेत आणि लाखो लोकांना रोजगारही उपलब्ध केला आहे.

Leave a Comment